हसीनाबी पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप; शाळेला १० हजारांचा निधी सुपूर्द

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत आर. के.ग्रुप च्या संचालिका हसीनाबी लेकत पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी १० हजार रुपयांचा निधी शाळेला सुपूर्द करण्यात आला. पठाण परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कडू सर यांनी केले. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, केंद्रप्रमुख भास्कर तांबे सर, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत सर आणि पत्रकार युनूस पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त शाळेला आर्थिक मदत करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याचा पठाण परिवाराचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. हसीनाबी पठाण यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि शाळेला आर्थिक मदत या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अशा उपक्रमांमुळे शाळेच्या विकासाला हातभार लागण्यासोबतच विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अकबरभाई पठाण, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आकाश चेडे, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, बन्सी पाटील मुंगसे, बाळासाहेब वांढेकर, बहिरू मुंगसे, भाऊसाहेब चांडे सर, अविनाश कोकाटे सर, विकास वाघ सर आदी मान्यवर उपस्थित होते.
तर वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन एस.बी मुंगसे मॅडम,एस.ए.जाधव मॅडम, व्ही. बी. पवार मॅडम, एस.एम.काळे मॅडम, यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक घटमाळ सर यांनी केले, तर आभार गायकवाड सर यांनी मानले.