बालाजी देडगाव (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदैवत बाबीर बाबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवार, दि. १४ नोव्हेंबर व रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांसाठी हा उत्सव श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता सालाबादप्रमाणे बाबीर बाबांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उद्या रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम गज ढोल त्यानंतर होईक व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक सोहळ्याच्या माध्यमातून भाविकांना बाबीर बाबांचे दर्शन घेण्याची व महाप्रसादाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. या यात्रा उत्सवानिमित्त सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबीर बाबांचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकाळी नऊ ते 11 गजे ढोल बारा ते एक होईल नंतर महाप्रसाद होईल तरी भाविकांनी जास्त जास्त आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन बाबीर बाबा देवस्थानचे सर्वेसर्वा बाबासाहेब शिंदे, बाबीर देवस्थानचे अध्यक्ष मायनात शिंदे व आयोजकांनी केले आहे.

