चांगले केले तर चांगलेच होईल: स्वामी प्रकाशानंदगिरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने गुरुवर्य हभप स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांची कीर्तनरुपी सेवा पार पडली. यावेळी महाराजांनी संताविषयी माहिती देत असताना संत सावता महाराज यांनी कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी असे म्हणत कर्म करत असतांना भक्ती कशी करावी, याचे उदाहरण दिल्याचे […]

सविस्तर वाचा

‘साक्षात्कार’ या मराठी चित्रपटाचा जेऊर हैबती येथे उत्साहात शुभारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे वै. गुरुवर्य हभप शिवराम महाराज रिंधे यांच्या १०५ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वै. हभप शिवराम महाराज रिंधे व संत रेवूबाई खराडे यांच्या सत्य घटनेवर आधारित ‘साक्षात्कार’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात करण्यात आला.  या चित्रपटाची, कथा, पटकथा […]

सविस्तर वाचा

कुकाणा सिंचन शाखा नूतन कार्यालयीन इमारतीचे लोकार्पण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी) – मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू असताना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सिंचन झाले पाहिजे. यासाठी पाणी व्यवस्थित वापरणे व त्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी अधिकार्‍यांबरोबर शेतकऱ्यांनी देखील घ्यावी, अशी सूचना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केली. मुळा पाटबंधारे विभागाच्या चिलेखनवाडी उपविभागाअंतर्गत कुकाणा सिंचन शाखा क्रमांक २ च्या नूतन कार्यालयीन इमारतीचे लोकार्पण […]

सविस्तर वाचा

‘साक्षात्कार’ या मराठी चित्रपटाचा उद्या जेऊर हैबती येथे शुभारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे वै. गुरुवर्य हभप शिवराम महाराज रिंधे यांच्या १०५ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वै. हभप शिवराम महाराज रिंधे व संत रेवूबाई खराडे यांच्या सत्य घटनेवर आधारित ‘साक्षात्कार’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ उद्या सोमवारी (ता.२१) सकाळी ८.३० वाजता आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील, राष्ट्रवादीचे नेते […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती येथे गुरुवारपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत नामदेव महाराज व श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त तांबे वस्ती येथे हभप बन्सी महाराज तांबे यांचे कृपाशीर्वादाने, हभप गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड) यांच्या आशिर्वादाने व हभप गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या प्रेरणेने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. १७ जुलै […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथे बिबट्या जेरबंद; आज पहाटे अडकला पिंजऱ्यात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील माजी चेअरमन अरुणराव घाडगे यांच्या वस्तीशेजारी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज पहाटे चार वाजता बिबट्या अडकला. या बिबट्याने या परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. माजी चेअरमन अरुणराव घाडगे, कुंडलिक शेटे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा या बिबट्याने फडशा पाडला होता. त्यामुळे या परिसरात दहशत पसरली होती. या परिसरात […]

सविस्तर वाचा

शरद रंगनाथ तांबे यांची सावता परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी निवड

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शरद रंगनाथ तांबे यांची सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रावसाहेब फुलसौंदर यांनी तांबे यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले. या निवडीबद्दल बालाजी देडगाव येथे शरद तांबे यांचा मावळते अध्यक्ष संतोष तांबे मित्रमंडळ व विविध संघटनांच्यावतीने […]

सविस्तर वाचा

राहुल पालवे यांना जगतगुरू संत तुकाराम महाराज युवा संगीत अलंकार पुरस्कार जाहीर

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर सलग्न स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालय, निमगाव वाघा (ता.नगर) यांच्या वतीने देण्यात येणारा जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा संगीत अलंकार पुरस्कार 2025 नेवासा तालुक्यातील माका येथील राहुल शिवाजीराव पालवे यांना जाहीर करण्यात आला आहे. राहुल […]

सविस्तर वाचा

आदिनाथ ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश; सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शाळा खोल्यांचे लोकार्पण 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी युवा नेते आदिनाथ ठोंबरे यांच्या आग्रहाखातर शाळेच्या दोन वर्ग खोल्या मंजूर केल्या होत्या. त्या खोल्याचे काम पूर्ण झाल्याने सुजय विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम माजी खासदार सुजय विखे पाटील यांची गावातून ढोल […]

सविस्तर वाचा

कृषीदुतांकडून महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त देडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत कृषी महाविद्यालय भानसहिवरेच्या कृषीदूतांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या अंगणात कृषी दिनानिमित्त एकूण सात झाडांचे वृक्षारोपण कृषिदुतांकडून करण्यात आले. कृषी महाविद्यालय भानसहिवरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरभटमट, गटाचे पथप्रदर्शक प्रो. मनोज माने व प्रो.संदीप सोनवणे […]

सविस्तर वाचा