बालाजी देडगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक पाळीव प्राण्यांची शिकार या बिबट्याने केली आहे. तसेच अनेकांना या बिबट्याचे मुक्त संचार करताना दर्शन झाले आहे. गावालगत असलेल्या अरुण वांढेकर यांच्या घरासमोर बांधलेल्या बोकडाचा या बिबट्याने आज (ता.८) पहाटे फडशा पाडला. या अगोदर प्रेमचंद हिवाळे यांच्या कुत्र्याचाही या बिबट्याने फडशा पाडला होता. […]

सविस्तर वाचा

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

शिर्डी: अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती […]

सविस्तर वाचा

देडगाव येथील महादेव मंदिरात शिखर बांधकामाचे भूमिपूजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महादेव मंदिरातील गणपती मंदिर शिखर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. हस्तरेषा तज्ञ कनकमलजी मुथ्था यांच्या प्रेरणेने व कैलासनाथ मित्रमंडळाच्या अधिपत्याखाली महादेव मंदिर व परिसरात विविध कामे सुरु आहेत. यावेळी सोपान तांबे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. शिखर बांधकाम भूमिपूजन प्रसंगी सपना […]

सविस्तर वाचा

पावन महागणपती देवस्थानच्या उत्सवाला आजपासून सुरुवात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे व परिसरातील पावन महागणपती देवस्थानच्या उत्सवास सालाबादप्रमाणे उत्साहात सुरुवात करण्यात आली. मागील 27 वर्षापासून गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, सुनीलगिरीजी महाराज, गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, ह भ प सदाशिव महाराज पुंड यांच्या अधिपत्याखाली […]

सविस्तर वाचा

अहिल्याबाई होळकर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवले मातीचे पर्यावरण पूरक गणपती

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देडगाव येथील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा विकास व्हावा याच हेतूने पर्यावरण पूरक नैसर्गिक माती पासून गणेश गणपती बनवण्याची कार्यशाळा संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून नुकतीच पार पडली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आकर्षक व सुबक गणपती मूर्ती […]

सविस्तर वाचा

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त क्षिरसागर परिवाराच्या वतीने महादेव मंदिरात महाअभिषेक

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील प्रसिध्द अशा महादेव मंदिर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त क्षिरसागर परिवाराच्या वतीने महाअभिषेक व आरती करण्यात आली. तसेच यावेळी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या काळामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायणही करण्यात आले. येथील महादेव मंदिर येथे कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षिरसागर परिवाराचे […]

सविस्तर वाचा

आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा- समाधान महाराज शर्मा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा असून यातून मिळणारे पुण्य हे सर्व पुण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांनी केले. बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे स्व. आसराबाई रायभान तांबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा (रामकृष्ण परमहंस, केज) यांच्या सुमधुर व भक्तिपर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला, यावेळी श्रोत्यांनी अध्यात्मिक […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. या बैलगाडा शर्यतीमध्ये बिनजोडमध्ये लक्ष्मण आयनार (शिर्डी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर कोकरे (फत्तेपूर) यांनी द्वितीय क्रमांक पटवला. तर बबनराव लंघे पाटील (दोन्ही गाडी), लक्ष्मणराव पांढरे, […]

सविस्तर वाचा

जेऊर हैबती येथील पारायण सोहळ्यात आज प्रकाशनंदगिरीजी महाराजांची किर्तनसेवा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आज शुक्रवारी (ता.१८) हभप महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांची किर्तनसेवा रात्री ७ ते ९ या वेळेत होणार आहे. काल गुरुवारी (ता.१७) हभप योगिराज महाराज पवार शास्त्री (भागवताचार्य अमळनेर) यांच्या कीर्तनासाठी भाविक मोठ्या […]

सविस्तर वाचा

जेऊर हैबती येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. १२ एप्रिल ते शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ या कालावधीत पावन हनुमान मंदिर देवस्थान येथे करण्यात आले आहे. वै. हभप शिवराम महाराज रिंधे, वै. हभप गुरुवर्य बन्सी महाराज तांबे (श्री क्षेत्र नेवासा), वै. […]

सविस्तर वाचा