भाषेचा अभिमान आणि विज्ञानाची जाण यांचा संगम प्रेरणादायी-  पत्रकार एडके

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- भाषेचा अभिमान आणि विज्ञानाची जाण यांचा संगम प्रेरणादायी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे ही समाधान व अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये […]

सविस्तर वाचा

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या माका महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५–२०२६ अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा.उदयनदादा गडाख पाटील होते, तर […]

सविस्तर वाचा

शहापूर ग्रामपंचायतचे वतीने मागासवर्गीय नागरिकांना मोफत जार वाटप

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शहापूर ग्रामपंचायतचे वतीने मागासवर्गीय नागरिकांना मोफत जार वाटप व मागासवर्गीय विधवा महिलांना वर्षभर मोफत पाणी वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील सर्व मागासवर्गीय कुटुंबांना मोफत पाण्याचे जार वाटप करण्यात आले तसेच मागासवर्गीय विधवा महिलांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत आरो फिल्टर पाणी वाटप करण्याचे ठरले. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे व लहान मुलांचे […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ यात्रा महोत्सवाची निकाली कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तेलकुडगाव येथील  ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सवाचे महाशिवरात्रीपासून १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी असे चार दिवसीय यात्रा महोत्सव अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाला. रविवार दि. १५/०२/२०२६ सकाळी महाशिवरात्री निमित्त हभप गणेशजी महाराज कुदळे यांची किर्तनसेवा होऊन श्री जनार्दन गटकळ, श्री अरुण पा घाडगे मा.चेअरमन, श्री किशोर काळे सर, चि.प्रणव […]

सविस्तर वाचा

देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या गोड शिवघोषणांनी मिरवणूकीला सुरुवात झाली.त्यांच्या घोषणांनी सर्व परिसर चैतन्यमय झाला.परिसरातील महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे मिरवणुकीत शिवपूजन केले.कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीने केली. अध्यक्षदी साहेबराव कदम होते. […]

सविस्तर वाचा

मुळा धरणातून २३ फेब्रुवारीपासून आवर्तन; जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आदेश

जनशक्ती (वृत्तसेवा)- शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्यारील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी २३ फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खालावल्याने शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. यासंदर्भात आमदार […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे शिवजयंती व शिव मंदिराचे भूमिपूजन उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून, नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बबन देवा तांदळे यांच्या वेदोक्त मंत्रोच्चारात […]

सविस्तर वाचा

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेत शिवजयंती साजरी करण्यात आली. यामध्ये प्रथम नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कडूभाऊ तांबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. माजी सरपंच महादेव पुंड, अ‍ॅड. कुणाल शिंदे, हरिभाऊ गोयकर, योसेफ हिवाळे, सुरेश हिवाळे, जालिंदर […]

सविस्तर वाचा

शिवनेरी गडावर मोठी चेंगराचेंगरी, लहान मुलांसह महिला जखमी

जनशक्ती न्यूज (वृत्तसेवा)- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या शिवजन्मस्थळ शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेले नागरिक यामुळे गड परिसर रात्रीपासूनच गजबजला होता. शिवजयंती म्हटले की, शिवभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त लोकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, […]

सविस्तर वाचा

घोडेगाव येथे होणार अतिरिक्त तहसील कार्यालय; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्याची वाढती लोकसंख्या आणि शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप वाढत चालला आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील सहा महसूल विभागात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी तर ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अकोले तालुक्यातील राजूर येथे अतिरिक्त तहसील कार्यालय होणार आहे.जिल्हा […]

सविस्तर वाचा