नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कामाला धडाकेबाज सुरुवात

जनशक्ती (वृत्तसेवा)- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कामाची कार्यतत्परता दाखवत नेवासा तालुक्यातील पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या पीक व फळबागांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश नेवासा तहसीलदारांना दिले आहे. दोन दिवसापूर्वी खासदारपदी निवड झाली, सत्कार समारंभ शुभेच्छांचा ओघ चालू असताना शेतकरी वर्गावर आलेल्या संकटाची जाण ठेवून सत्कार समारंभ बाजूला करत प्रथम त्या […]

सविस्तर वाचा

कृष्णानंद कालिदास महाराजांना शनिरत्न पुरस्कार प्रदान 

विजय खंडागळे ……………………………….. सोनई (प्रतिनिधी)- शनिशिंगणापूर ता नेवासा येथे श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शनिशिंगणापूरच्या वतीने देवस्थाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर (भाऊ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी श्री श्री 1008 परमहंस कृष्णानंद कालिदास महाराज हरियाणा यांना शनिरत्न पुरस्कार श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व समाधान महाराज शर्मा, महंत सुनीलगिरीजी […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथे ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचं महान दैवत, 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. शिवरायांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला, म्हणून रायगडमध्ये त्यांचा राज्याभिषेक करुन त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. दरवर्षी 6 जून या दिवशी सर्व शासकीय कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा शिवस्वराज्य दिन म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा […]

सविस्तर वाचा

चोंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

जनशक्ती, वृत्तसेवा- लोकमाता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल तसेच सर्व शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जामखेड तालुक्यातील चौंडी येथे केली. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी ): नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे होते. तर जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक […]

सविस्तर वाचा

माका येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी एकत्रित येऊन पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवा नेते संभाजी लोंढे, मच्छिंद्र लोंढे, रविंद्र खेमनर, राम काळे, खंडूभाऊ लोंढे,अँड. गोकुळ भताने यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनिल शिंदे, पत्रकार […]

सविस्तर वाचा

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.96 टक्के

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.96 टक्के लागला. विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली. यंदाही मुलींनी बाजी मारली. विद्यालयात गुणानुक्रमे तेजस्विनी रामचंद्र कदम 90.80 टक्के प्रथम, ताराचंद ज्ञानदेव होंडे 86.60 टक्के द्वितिय, आदित्य एकनाथ टाके याने 85.40 टक्के गुण मिळवत […]

सविस्तर वाचा

दहावीच्या परीक्षेत श्रावणी विजय भताने माका विद्यालयात प्रथम 

बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील माका येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी  श्रावणी विजय भताने हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख, नेहलताई गडारव, तसेच संस्थेचे विनायक देशमुख […]

सविस्तर वाचा

तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलची एसएससी परीक्षेत गरुडझेप 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मीडिअम स्कूलने दहावीच्या उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तक्षशिला इंग्लिश मीडिअम स्कूलने शंभर टक्के निकालासोबतच उत्तुंग असे यश मिळवले आहे. यामध्ये राऊत ऋतिका नितीन या विद्यार्थिनीने 93.40 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर म्हस्के प्रांजल गणेश या विद्यार्थिनीने 93.20 टक्के गुण […]

सविस्तर वाचा

एकात्मिक पद्धतीने पिक व्यवस्थापन काळाची गरज

जनशक्ती (वृत्तसेवा)-भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे मार्फत खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये २०० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५०० शेतकऱ्यांच्या शेतावर समुह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिकाचे नियोजन कृषि विद्या विभाग मार्फत कोळगाव व हसनापुर येथे करण्यात आले आहे. हसानापुर येथे सोयाबीन एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञान” […]

सविस्तर वाचा