घुले बंधूंच्या नेतृत्वात लोकनेते मारुतराव घुले पाटील  ज्ञानेश्वर सहकार साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- माजी आमदार नरेंद्र घुले आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कारखान्याच्या सर्व २१ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कारखाना परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बिनविरोध निवडीमुळे घुले बंधूंचे सहकार क्षेत्रातील नेतृत्व आणि संघटन कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कारखान्याच्या विकासासाठी सर्व घटकांनी दाखविलेल्या एकजुटीचे हे प्रतीक मानले जात आहे.
निवडणुकीत शेवगाव, शहरटाकळी, कुकाणा, नेवासा, वडाळा आणि ढोरजळगाव गटांसह महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, नामाप्रवर्ग तसेच उत्पादक व बिगर उत्पादक संस्थांच्या मतदारसंघातील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी व सभासदांनी घुले बंधूंचे अभिनंदन करत कारखान्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बिनविरोध निवडणुकीमुळे कारखान्याच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
“सहकार, विकास आणि एकजुटीचा विजय” अशी भावना यावेळी सभासद व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. घुले बंधूंच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भविष्यात अधिक प्रगतीपथावर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बिनविरोध निवडून आलेले संचालक असे…

शेवगाव गट (३ जागा बिनविरोध):–
नरवडे सुधाकर नारायणराव,
भोसले पंडीत रामभाऊ,
राजपूरे रामनाथ नामदेव

 

शहरटाळकी गट (३ जागा बिनविरोध):–

घुले नरेंद्र मारुतराव, घुले चंद्रशेखर मारुतराव,
खरड बाळासाहेब बापूसाहेब

कुकाणा गट (३ जागा बिनविरोध):–
म्हस्के नारायण कारभारी, देशमुख हिम्मतसिंह देसाई, अभंग अमोल विठ्ठल

नेवासा गट (२ जागा बिनविरोध):–
शेळके जनार्दन कचरु व
कोकणे दादासाहेब गुलाबराव

वडाळा गट (२ जागा बिनविरोध):–
कदम जनार्दन रामभाऊ व पटारे प्रसाद जनार्दन

ढोरजळगाव गट (२ जागा बिनविरोध):–

म्हस्के मच्छिंद्र सुर्यभान व भेंडेकर गोरक्षनाथ विठठल

अनु.जाती/जमाती मतदार संघ (बिनविरोध):–

नन्नवरे विकास चंद्रभान

 

महिला प्रतिनिधी मतदार संघ (२ जागा (बिनविरोध):–

काळे सुमनबाई दत्तात्रय व
तानवडे रंजना अशोक

भटके-विमुक्त मतदार संघ (बिनविरोध):– मिसाळ अशोक लक्ष्मण

नामाप्रवर्ग मतदार संघ (बिनविरोध):–
पावसे संतोष शंकरराव

उत्पादक सहकारी संस्था,बिगर उत्पादक-पणन संस्था मतदार संघ जागा(बिनविरोध):–बबनराव भुसारी