महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे वतीने सुखदेव फुलारी यांचा सत्कार

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक व सीनियर डिस्टिलरी केमिस्ट सुखदेव फुलारी यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत देण्यात येणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे नवनिर्वाचित  संचालक मंडळाची सभा शुक्रवार दि.१० जुलै रोजी कारखान्याचे
अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली व संचालक माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाली,त्यात श्री.फुलारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, संचालक पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ,डॉ.नारायण म्हस्के,जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अड.हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे,  जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड,  काशिनाथ नवले, दत्तात्रय काळे, अशोक तानवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, ए.बी.खरड, तांत्रिक सल्लागार
एम.एस.मुरकुटे, एस.डी.चौधरी, महेंद्र पवार,प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के,मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, विलास लोखंडे, सुधाकर ढाकणे, हनुमंता शेंडगे, महेश भवर,
दत्तात्रय चिमणे,कल्याण जांभूळकर आदी यावेळी उपस्थित होते.