इमामपूर घाट आता झाला ज्ञानेश्वरी घाट; उद्धव महाराज व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थित नामकरण

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- उद्धव महाराज मंडलीक नेवासेकर, देविदास महाराज म्हस्के तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इमामपुर घाटाचे नामकरण ज्ञानेश्वरी घाट असे करण्यात आले.
यावेळी हभप राम महाराज झिंजुर्के, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख यांच्यासह हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत इमामपुर घटाचे नामकरण ज्ञानेश्वरी घाट करण्यात आले. या प्रसंगी हजारो वारकरी उपस्थित होते. यावेळी घाटाच्या पायथ्याला ज्ञानेश्वर महाराजांचे शिल्प व पैस खांबाची प्रतिकृती साकारण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.