बालाजी देडगावच्या आकांक्षा विनोद तांबे यांना राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये साहित्य व काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आकांक्षा विनोद तांबे यांना ‘राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बालाजी देडगाव येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व कचरू तांबे यांच्या त्या सुनबाई असून, साहित्य व काव्य क्षेत्रात आपल्या लेखणीतून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आकांक्षा तांबे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या गौरवामुळे बालाजी देडगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथील पत्रकार भवन, नवी पेठ येथे हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. नितीन धवणे-पाटील, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध ज्येष्ठ सिनेअभिनेते सुनील नाना गोडबोले, तसेच अभिनेत्री आर्या धारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्रचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. दीपक दादाराव जाधव यांनी केले.
आकांक्षा तांबे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल बालाजी देडगाव परिसरासह साहित्यिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह गावाच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे.