जिल्हा परिषद शाळा आठवडचा नाविन्यपूर्ण उपक्रम ‘क्षेत्रभेट’

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवड मधील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत चिचोंडी पाटील येथील ए डी सी सी बँक शाखा चिचोंडी पाटीलला भेट दिली. या क्षेत्रभेट उपक्रमामधून विद्यार्थ्यांना बँकेविषयी सखोल माहिती मिळाली बँकेचे व्यवहार पैसे भरणा करणे, पैसे काढणे, बँकेची विविध प्रकारची सुविधा बँकेची खाती या प्रकारचे अमूल्य असे ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले.
विद्यार्थ्यांनी स्वतः चलन भरून खात्यावर पैसे जमा करण्याचा अनुभव घेतला. यावेळी बँकेचे मॅनेजर श्री. साठे साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी बँकेचा संपूर्ण स्टाफ हा विद्यार्थ्यांना सहकार्य करत होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. विद्यार्थी बँकेची माहिती जाणून घेण्यासाठी आले बद्दल बँकेतील संपूर्ण स्टाफ अधिकारी यांना कौतुक वाटले. यावेळी बँक मॅनेजर श्री. साठे साहेब यांनी विद्यार्थ्यांना खाऊ व पेन्सिल वाटप केले.
यावेळी छान असे मार्गदर्शन केल्याबद्दल तसेच बँक क्षेत्रभेट करिता परवानगी दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप वाघमारे सर यांनी बँकेचे मॅनेजर श्री साठे साहेब यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. बँकेने ही यावेळी शिक्षकांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांना शाळेपासून बँकेपर्यंत नेण्या आणण्याची आपल्या स्वतःच्या गाडीची सोय शाळेचे पालक शैलेश लगड यांनी केली त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. शाळेचे आदर्श शिक्षक श्री अजय भद्रे सर यांनी यावेळी संपूर्ण बँकेचे मॅनेजर संपूर्ण स्टाफ सहकार्य केलेले पालक या सर्वांचे आभार मानून क्षेत्रभेट उपक्रमाचा समारोप केला.