बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील लांघे परिवाराकडून मातोश्री कै. भामाबाई भानुदास लांघे यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (तेलकुडगाव, ता. नेवासा)या शाळेस २१ हजार रुपये किंमतीचे कॅनन कंपनीचे कलर प्रिंटर भेट देण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण आबासाहेब काळे, उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक, उपस्थित पालक बंडू काळे, दीपक घाडगे, राजेंद्र गटकळ, शिक्षक वृंद यांनी ही भेट स्वीकारली. रामायणाचार्य हनुमंतजी महाराज वैष्णव सेवा आश्रम बऱ्हाणपूर यांचे हस्ते ही भेट देण्यात आली. शाळेच्या वतीने मातोश्री कै. भामाबाई भानुदास लांघे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. लांघे परिवाराने शाळेस दिलेल्या अनमोल देणगी बद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

