बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- भातकुडगाव येथील सुमनबाई मोहन गायकवाड (वय ८७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असे. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पुणे वाघोली येथील बिल्डर कचरू गायकवाड व एलआयसी ऑफिसर कुशीनाथ गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.

