तांबे वस्ती शाळेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तांबे होते.
या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघाची फेररचना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून संजय उत्तम तांबे, उपाध्यक्षपदी बाबासाहेब बाजीराव तांबे, कोषाध्यक्ष गणेश तांबे तर सचिवपदी मुख्याध्यापक देविदास कचरे सर यांची तसेच सल्लागार म्हणून नांगरे सर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नांगरे सर यांनी केले. माजी विद्यार्थी संघाचे महत्त्व व कार्यशाळेचे महत्त्व मुख्याध्यापक कचरे सर यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थी संकेत तांबे, योगेश तांबे (सदस्य शाला व्यवस्थापन समिती), शरद तांबे (उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती), ओमकार तांबे, अक्षय तांबे, संभाजी तांबे, अभय तांबे, अमोल तांबे, गणेश तांबे उपस्थित होते. संभाजी तांबे यांनी पालकांनी आपली मुले जिल्हा परिषद शाळेत टाकावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमास देडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भास्कर तांबे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. माजी विद्यार्थी संघास त्यांनी रुपये 5000 प्रोत्साहन पर मदत जाहीर केली. कार्यक्रमाचे आभार कचरे सर यांनी मानले.