देडगाव ग्रामपंचायतमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव ग्रामपंचायतमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, चेअरमन जनाभाऊ देशमुख, उपसरपंच आनंद दळवी, माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, पोपट मुंगसे, शरद काशिनाथ तांबे, राजेंद्र ससाणे, श्रीकांत हिवाळे, विश्वास हिवाळे, आशिष हिवाळे, पत्रकार इंनुस पठाण, बाळासाहेब म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याचा परिचय करुन दिला. शेवटी फकीरचंद हिवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.