अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पत्रकार बन्सीभाऊ एडके यांचा विविध संघटनेकडून सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व श्री संत रोहिदास महाराज देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष बन्सीभाऊ एडके यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध संघटनाकडून सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामपंचायत देडगावच्या वतीने सरपंच चंद्रकांत मुंगसे व इतर सदस्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी सन्मान केला. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यानंतर माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाणे यांच्या वतीनेही सन्मान करण्यात आला. पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार युनूस पठाण यांनी सन्मान केला. सावता परिषदेच्या वतीने संतोष तांबे यांनी तर सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने चेअरमन सागर बनसोडे यांनी तर बालाजी देवस्थानच्या वतीने अध्यक्ष नवनाथ मुंगसे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी रघुनाथ कुटे, जनाभाऊ मुंगसे, रामभाऊ कुटे, शिक्षक नेते संजयकुमार लाड, अरुण वांढेकर, रेवणनाथ सातपुते, प्रा. राजू बनसोडे सर, संपत ससाणे, वसंत ससाणे, विवेक औटी, शुभम दीक्षित, विलास देशमुख, महादेव पुंड, निवृत्ती मुंगसे, एकनाथ शेजुळ, शरद तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले. पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.