मुळा कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल एकनाथ जगताप यांचा सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक एकनाथ जगताप यांची सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा विविध संघटनाकडून सन्मान करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आकाश चेडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार इंनुस पठाण, बहिरनाथ मुंगसे, म्हस्के, पप्पू जगताप महेश जगताप, गणेश जगताप, कानिफनाथ जगताप, सचिन जगताप, उमेश जगताप आदी हिवरा माका, पाचुंदा येथील त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.