श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान भिवधानोरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे उद्या प्रस्थान

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)-  श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान भिवधानोरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान उद्या दिनांक 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी आठ वाजता प्रस्थान होणार आहे यावेळी दिंडीचे सदस्य भगवान गुरु यांनी बोलताना सांगितले की आषाढी पायी वारी दिंडी सोहळा श्री भीमाशंकर संस्थान भिवधान वरती श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये व भिवधानोरा परिसरातील जास्तीत जास्त वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन दिंडी सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हा दिंडी सोहळा पंधरा दिवसीय असून या दिंडी सोहळ्यामध्ये नित्यनेमा नुसार काकडा भजन गाथा मधील अभंग गवळणी व हरिपाठ याचा समावेश असणार आहे यावेळी दिंडी चालक ह भ प श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्रीकृष्णानंद गिरीजी महाराज नागे यांचे दररोज दुपारी प्रवचन व सायंकाळी रात्री सात ते आठ या वेळेमध्ये कीर्तन सेवा संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी व वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याच्या आव्हान श्री भीमाशंकर संस्थान आषाढी पायी वारी दिंडी सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी दिंडी चालक ह.भ.प श्री कृष्णानंदजी महाराज नागे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा संपन्न होत आहे , भीमाशंकर दिंडी कमिटी सदस्य अध्यक्ष अण्णासाहेब उत्तम चव्हाण, उपाध्यक्ष जनार्दन बाबुराव चव्हाण, सचिव रामकिसन शंकरराव चव्हाण, सदस्य दादासाहेब भिवा चव्हाण, रायभान लांडे ,अंकुश चव्हाण, शेषराव चव्हाण ,मोहन चव्हाण ,ज्ञानेश्वर चव्हाण, गोरख चव्हाण, अनिल नागे ,सखाराम चव्हाण, दिंडी कमिटी अध्यक्ष ,सचिव तसेच समस्त ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.