बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव ग्रामपंचायातने यात्रा वर्गणीच्या उरलेल्या पैशातून नागरिकांना अल्प दरात नर्सरीमधून आणलेल्या कलम केलेल्या आंब्याच्या रोपांचे वाटप केले. गाव व परिसरात वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण विकासासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, उपसरपंच आनंद दळवी,
कृषी अधिकारी संजय कदम, केंद्रप्रमुख भास्कर तांबे सर, आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत सर, खंडू कोकरे सर, भाजपचे आकाश चेडे, उध्दव मुंगसे, सारंगधर मुंगसे, ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, युवा नेते निलेश कोकरे, शिवाजी लांघे सर, विश्वास हिवाळे, माजी उपसरपंच महादेव पुंड, अंबादास मुंगसे, किशोर कदम, अविनाश तांबे, पत्रकार इंनुस पठाण, लक्ष्मण मुंगसे, बाळासाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने चिंच, आवळा यासारख्या वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच चंद्रकांत मुंगसे म्हणाले की, देडगाव व परिसरामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा ग्रामपंचायतचा मानस असून दरवर्षी याप्रमाणे वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या विकासासाठी ग्रामपंचायत आग्रही असून ग्रामस्थांनीही सहकार्य करावे. देडगाव ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षांचे वाटप सुरू असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.


