प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल उद्धव राजू एडके यांचा नागरी सत्कार

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील उद्धव राजू एडके यांची सेंटर रेल्वे पुणे येथे क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बालाजी देडगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, माजी सरपंच मच्छिंद्र कदम, बहिरनाथ एडके, महादेव एडके, राजू एडके, सुरेंद्र बनसोडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्धव एडके यांनी आपण परीक्षेची कशी तयारी केली. तयारी करत असताना कोणत्या अडचणी आल्या. या अडचणींवर कशी मात केली याविषयी माहिती दिली. शेवटी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.