बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- देडगाव येथील राजेंद्र आजिनाथ आठरे यांची राज्य कर निरीक्षक (STI) पदावर निवड झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी आकांक्षा विनोद तांबे यांना सह्याद्री रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व उद्धव राजेंद्र एडके यांची रेल्वे क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पाटील मुंगसे होते तर प्रास्ताविक सेवानिवृत्त आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत सर यांनी केले.
तर बालाजी देवस्थानचे सचिव ज्ञानदेव कदम सर, सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, ॲडिशनल कमिशनर रमेश देवा तांदळे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपल्या मनोगतंतून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळविलेल्या या यशाबद्दल राजेंद्र आठरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजेंद्र आठरे बोलताना म्हणाले की गावातील माजी विद्यार्थी संघ संचलित वांडेकर गुरुजी वाचनालय च्या माध्यमातून मला मोठा फायदा झाला व माझ्या यशा मागं माझे आई-वडील व भावांचा सिंहाचा वाटा राहिला. आठ वर्षाच्या संघर्षानंतर मलाही यश मिळाले आहे. तर ग्रामस्थांनी सन्मान केल्याबद्दल मी ऋणी राहील.
यावेळी ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे, केंद्रप्रमुख भास्कर तांबे, माजि चेअरमन . लक्ष्मण कदम, महादेव एडके,पत्रकार युनूस पठाण,आजिनाथ आठरे, विजय आठरे, कचरू तांबे, विनोद तांबे, बालाजी देवस्थानचे खजिनदार संभाजी राजे काजळे, माजी अध्यक्ष नवनाथ मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे,विश्वस्त चांगदेव महाराज तांबे,उद्धव मुंगसे, दत्ता पाटील मुंगसे,
ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे,शरद तांबे, माजी उपसरपंच महादेव पुंड, सोपान मुंगसे,गणपत तात्या मुंगसे, राजेंद्र बनसोडे सर,ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राजेंद्र आठरे यांचा पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला.
यावेळी कार्यक्रमाचे आभार मानत असताना आकांक्षा तांबे यांनी गावांनी दिलेले प्रेम हे माझ्यासाठी खूप मोठे वरदान असेल व माझ्या यशा मागं माझे पती व सासू-सासरे यांची मला पूर्णपणे साथ लाभली. म्हनत सर्वांचे आभार मानले.

