अहिल्याबाई होळकर विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कडूभाऊ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. प्रथमतः वंदे मातरम,भारत माता की जय,जय जवान जय किसान, झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत गावभर प्रभात फेरी काढण्यात आली होती प्रभात फेरीनंतर विद्यालयाच्या प्रांगणात मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम,राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर विद्यार्थ्यांच्या कवायतीतून व्यायाम व व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक किशोर मुंगसे सर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करत प्रास्ताविकात देशासाठी रक्त सांडलेल्या वीर जवानांना अभिवादन करत मानवी हक्काची व मूल्याची जाणीव करून दिली व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची व बलिदानाची आठवण करून दिली.विद्यार्थ्यांनी देशाची एकता, अखंडता व लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संदेश दिला.
तर शाळेच्या वतीने बालविवाह रोखण्यासाठी सर्वांना बालविवाह कायद्याचे संरक्षण व जबाबदारी साठी शपथ देण्यात आली. कार्यक्रमास सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी उपसरपंच महादेव पुंड, मच्छिंद्र मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सोमनाथ मेजर, माजी मुख्याध्यापक ज्ञानदेव कदम सर, बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष नवनाथ मुंगसे, बालाजी देवस्थानचे खजिनदार संभाजीराजे काजळे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य किशोर मुंगसे, जनार्दन देशमुख, चांगदेव टकले, सुभाष मुंगसे तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक जाधव सर व , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.