बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व तेलकुडगाव येथील शेतकऱ्यांचे जवळपास सुमारे एक कोटी २९ लाख रुपये ठेवी, पैसे व ५५ तोळे सोनेतारण श्री संत माऊली (तिसगाव अर्बन) या पतसंस्थेत अडकले असून याबाबत पतसंस्थेचे चेअरमन सुनील बाबासाहेब शिरसाठ व ११ जणांची बॉडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनास सांगून जलद गतीने तपास होऊन लवकरात लवकर आरोपींना अटक करा तसेच आमच्या ठेवीदारांचे पैसे व सोने परत मिळवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करा, असे निवेदन देडगाव व तेलकुडगाव येथील ग्रामस्थांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना दिले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पाथर्डी येथील पोलीस निरीक्षक कोकरे साहेब यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून याबाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, तेलकुडगावचे सरपंच सतीशराव काळे पाटील, भाजप नेते अंकुश काळे, युवा नेते निलेश कोकरे, भाजप नेते आकाश चेडे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, कैलासनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ कदम, सुनील मुथ्था, पांडुरंग रक्ताटे, बंडू मुंगसे, संभाजी कदम, बन्सी मुंगसे, आदिनाथ उंडे, गोकुळ वांढेकर, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख आदी ठेवीदार उपस्थित होते.

