बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली देडगाव शाखेचा १७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री संत नागेबाबा प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी सर्व सभासद व खातेदार उपस्थित होते. यावेळी सभासदांना प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली.

