बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. दीर्घकाळ केलेल्या शैक्षणिक सेवेचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव गडाख होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार सुधीरभाऊ तांबे, माजी आमदार यशवंत तात्या माने, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसनराव चव्हाण, माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, हभप गुरुवर्य सुरेशानंद शास्त्री महाराज उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
त्यानंतर प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड यांचा प्रथम माजी विद्यार्थी संघ, ग्रामपंचायत देडगाव, मुळा एज्युकेशन संस्था, अहिल्याबाई होळकर शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध मान्यवर, ऋतुजा मुंगसे, आमदार सुधीरभाऊ तांबे, आमदार यशवंत तात्या माने, प्राध्यापक किसनराव चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त करत सरांच्या जीवन कार्याला उजाळा देत मनोगतातून गायकवाड सरांच्या शिस्तप्रिय, विद्यार्थीहितदक्ष व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा गौरव केला.
गेल्या 35 वर्ष 6 महिने या वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. शैक्षणिक गुणवत्ता, संस्कारमूल्ये, विविध उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्री शिक्षण यामुळे विद्यालयाची वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले असून विद्यालयाच्या प्रगतीत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत गायकवाड सरांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे, माजी सभापती भगवानराव गंगावणे, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा पांढरे, संचालक एकनाथराव जगताप, केंद्रप्रमुख भास्कर तांबे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच आनंद दळवी,चेअरमन सागर बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, माक्याचे सरपंच अनिल घुले, हभप डॉ. मचे महाराज, हभप बोरुडे महाराज, हभप गायके महाराज, हभप डमाळे महाराज, हभप मुंगसे महाराज, हभप पांडुरंग महाराज घुले,
हभप वाघमोडे महाराज, तसेच सुभाष जाधव शिवसेना नेते , ज्ञानेश्वर माउली जाधव, सोमनाथ जाधव, दादा माने पंढरपूर , भगवानराव गंगावणे, मल्हारी सांगळे , ऍड. गोकुळ भताने, रामदास घुले, ऍड. अरुण पालवे , सोनार साहेब , उद्धवराव सोनवणे , राजेंद्र लोहकरे, दुधाडे सर आदींसह संस्थेचे आजी माजी प्राचार्य व देडगाव, माका, पाचुंदा, म ल हिवरा व परिसरातील विविध संघटनेचे, शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार पर्यवेक्षक राशिनकर सर यांनी मानले.


