बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- चैतन्य नागनाथ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह तेलकुडगाव सोसायटीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याला श्री संत ज्ञानेश्वर देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले आणि माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, अँड. देसाई आबा देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते रेबीन कापून अर्बन सोसायटीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि उद्योजकांना आर्थिक क्षेत्रात नवी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी वेदांतचार्य देविदास महाराज म्हस्के, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले,
माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
नूतन चेअरमन मच्छिंद्र म्हस्के पाटील आणि व्हाईस चेअरमन महेश राजे काळे पाटील व संचालक मंडळ यांच्या विशेष प्रयत्नांतून या सोसायटीची स्थापना व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याबरोबरच सभासदांचा विश्वास संपादन करून पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरातील सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक कारभारी पाटील जावळे यांचा भव्य नागरी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला शिवसेना नेते रामदास गोल्हार, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ अण्णा नवले, जनार्धन पाटील कदम, प्रा. नारायण म्हस्के सर, मुळा बॅंकेचे चेअरमन माणिकराव होंडे, लक्ष्मण आबा पांढरे, माजी सभापती भगवानराव गंगावणे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, रमेश काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरीभाऊ शेळके, दिलीपराव पवार, माजी पंचायत समिती सदस्य
बाळासाहेब सोनवणे, माजी सरपंच सुरेश डिके, अशोकराव शेळके,
कडुभाऊ तांबे, रामदास शेलार, मोहनराव शेटे, बाळासाहेब काळे सर, अभिजित घोडेचोर, गणेश काळे, गोरक्षनाथ काळे, सुखदेव घाडगे कृष्ण दिंडी, अँड. गोकुळ भताने,त्रिमूर्ती संकुलाच्या अध्यक्ष सुमतीताई घाडगे, देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, हनुमंत गटकळ आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चैतन्य नागनाथ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नव्या वाटचालीला आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
गोरख घोडेचोर, नामदेव घोडेचोर, अशोक काळे, चेअरमन मालोजी गटकळ, शिवसेना नेते विलास काळे, तुळसीराम काळे, रविंद्र शेटे सर, विष्णुपंत जगदाळे, अमोल म्हस्के, राउसाहेब म्हस्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोसायटीचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. शेवटी चेअरमन मच्छिंद्र पाटील म्हस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.

