पाचुंदा येथे बाबीर बाबा पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे उद्या (दि.१५) होणाऱ्या बाबीर बाबा यात्रोत्सवानमित्त आज (दि.१४) बाबीर बाबा पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देवस्थानचे सर्वेसर्वा बाबासाहेब शिंदे व बाबीर देवस्थानचे अध्यक्ष मायनाथ शिंदे या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात गावातील व परिसरातील भाविक मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. बाबीर बाबाचा जयघोष करीत सर्व भक्तांनी आनंद लुटला. महिलांनी कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळी काढून फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणूक संपन्न झाली. यावेळी शृंगऋषी गडाचे महंत सुरेशानंदगिरीजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती. महिलांची फुगडी, पारंपारिक गीते व गज ढोल मिरवणुकीचे आकर्षण ठरले. 10c6c02e-34f9-40c5-b917-64aa47736c43आज सायंकाळी नामांकित वाघे बुवाजी भाऊ माने यांचा जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.