देडगाव येथे कृषिदूत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथे कृषी महाविद्यालय भानसहिवरेच्या कृषिदूतांचे आगमन झाले आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ते गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक मार्गदर्शन करणार आहेत. या कृषिदूतांचे देडगाव येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या गटाचे मार्गदर्शक डॉ. प्रकाश तुरभटमट सर व प्रा. मनोज माने सर असून या गटांमध्ये कृषिदूत […]

सविस्तर वाचा

ग्रामविस्तार अधिकारी सुभाष पाटील शेळके यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न

जनशक्ती (वृत्तसेवा)- स्वच्छ मन व निस्वार्थ माणूसकीचे धनी म्हणून सर्वत्र ओळख असलेले व ४० वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर ग्रामविस्तार अधिकारी सुभाष पाटील शेळके यांचा सेवापुर्ती सोहळा साधू संतांच्या व सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये प्रवरासंगम येथे संपन्न झाला. गावाला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याचे काम जे ग्रामसेवक भाऊसाहेब करत असतात असंच एक नेवासा तालुक्यातील सुभाष शेळके […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. या बैलगाडा शर्यतीमध्ये बिनजोडमध्ये लक्ष्मण आयनार (शिर्डी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर कोकरे (फत्तेपूर) यांनी द्वितीय क्रमांक पटवला. तर बबनराव लंघे पाटील (दोन्ही गाडी), लक्ष्मणराव पांढरे, […]

सविस्तर वाचा

नागेबाबा मल्टीस्टेटतर्फे देडगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना अनेक उपक्रम राबवत असते. या संस्थेच्या देडगाव शाखेत नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे सर यांनी प्रस्ताविकात […]

सविस्तर वाचा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तेलकुडगाव येथे कर्तबगार महिलांचा सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामसचिवालयामध्ये राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करून कर्तबगार महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी भारतीय संस्कृतीचे पुनर्जीवन करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतातील कर्तबगार स्त्रियापैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या एक होत. अहिल्यादेवीचां जन्म ३१ मे १७२७ […]

सविस्तर वाचा

उर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडून मुंगसे कुटुंबियांचे सांत्वन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विशाल कुंडलिक मुंगसे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुंगसे कुटुंबियांसह बालाजी देडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र राज्याच्या उर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी मुंगसे कुटुंबीयांची घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी मेघनाताई बोर्डीकर यांनी या दुःखातून सावरण्यासाठी मुंगसे कुटुंबियांना धीर दिला. यावेळी बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे शिव आराधन अध्यात्मिक दिव्य सोहळ्याचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दिव्य ज्योती जागृती संस्थान शाखा-पाथर्डीच्या वतीने तीन दिवसीय शिव आराधन अध्यात्मिक प्रवचन व भजन संकीर्तनाचे आयोजन बालाजी मंदिर सभा मंडपात २ जून ते ४ जून या रोजी दररोज सायंकाळी ६:३० ते ९:०० या वेळेत केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनुष्याला त्याच्या दैनंदिन जीवनात पडणाऱ्या विविध प्रश्नांची समाधानकारक […]

सविस्तर वाचा

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी चाइल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजमध्ये मदत केंद्र सुरू

जनशक्ती (वृत्तसेवा)- शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावीची प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करावयाचे ठरवले आहे. हे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? विद्यालयाचा प्राधान्यक्रम कसा निवडावा? त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावी? फॉर्म चे शुल्क किती भरावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर आहेत. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी चाइल्ड […]

सविस्तर वाचा

११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये मदत केंद्र सुरू

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करावयाचे ठरवले आहे. हे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? विद्यालयाचा प्राधान्यक्रम कसा निवडावा? त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावीत? फॉर्मचे शुल्क किती भरावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये ऑनलाइन मदत […]

सविस्तर वाचा

स्व. रखमाजी ननावरे व लक्ष्मीबाई ननावरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तनसेवा 

जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कै. श्री. रखमाजी घनाजी ननावरे व कै.सौ. लक्ष्मीबाई रखमाजी ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जगन्नाथ महाराज गवळी यांची किर्तनसेवा पार पडली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ननावरे परिवाराच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमासाठी  संपत रखमाजी ननावरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अ‍ॅड. शंकर कदम, सौ. कदम, प्रा. बन्सीभाऊ ननावरे, हभप वेताळ […]

सविस्तर वाचा