कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- रंगोत्सव सेलिब्रेशन मुलुंड ,मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेत नेवासा तालुक्यातील माका येथील कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सदर स्पर्धा परीक्षेत स्कूलचे एकूण 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील 18 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व रजत पदक मिळाले आहेत. […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे उद्या अध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने निरंकारी अध्यात्मिक सत्संग सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे. बालाजी देडगाव येथील गोयकर वस्ती, गार माथा येथे उद्या मंगळवारी १८ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे परम शिष्य परम आदरणीय महात्मा बाळासाहेबजी शेटे यांच्या […]

सविस्तर वाचा

आविनाश हिवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आविनाश हिवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहांमध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आविनाश हिवाळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी पोलीस उपनिरीक्षक कानडे साहेब, माजी उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे, बळीराज्य संघटनेचे […]

सविस्तर वाचा

जागतिक महिला दिनानिमित्त तेलकुडगाव येथे नागनाथ ग्रामसंघ आॉफिसचे उद्घाटन व महिला मेळावा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त नागनाथ ग्रामसंघ आॉफिसचे उद्घाटन, महिला मेळावा तसेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत तेलकुडगावने जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांच्या सहकार्यातून महिला मेळावा, महिला ग्रामसभा, घरकुल शुभारंभ, विविध उपक्रमांचे आयोजन केले.‌ जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा-2 महाआवास अभियान अंतर्गत मंजूर घरकुलापैकी शिलोवर्तीक रत्नाकर […]

सविस्तर वाचा

चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला दिन व माता पालक मेळावा उत्साहात

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावारूपाला आलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन व माता पालक मेळावा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रवींद्र गावडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सोनल मयूर वाखुरे (ज्येष्ठ कायदेतज्ञ) व डॉ. मनीषा […]

सविस्तर वाचा

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते बचत गटांना कर्ज वितरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कुकाणा (ता.नेवासा) येथे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार (दि.८) मार्च रोजी नारी शक्तीचा सन्मान सोहळा तसेच महिला आरोग्य शिबीर व महिला बचत गटांना महिला दिन कार्यक्रमात कर्ज वितरण वाटप आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रत्नमालाताई लंघे पाटील, जिल्हा परिषद सदस्या डॉ.तेजश्रीताई लंघे,नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, कुकाण्याच्या […]

सविस्तर वाचा

कुंडलिक बाबुराव मुंगसे पाटील यांचे मंगळवारी प्रथम पुण्यस्मरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील माजी सरपंच व ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक कुंडलिक बाबुराव मुंगसे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि. ११ मार्च २०२५ रोजी होणार आहे. यानिमित्त मुंगसे वस्ती येथे महंत हभप समाधान महाराज भोजेकर (जळगांव) यांचे सकाळी ९ ते ११ यावेळेत किर्तन होणार आहे. कुंडलिक मुंगसे पाटील यांचे सामाजिक व […]

सविस्तर वाचा

संजय गणपत शिंदे यांचे निधन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गणपत शिंदे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. अ‍ॅड. कुणाल शिंदे व विशाल शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथे स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या पुतळ्यांचे दहन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सकल हिंदू समाज व तेलकुडगाव ग्रामस्थ यांच्यावतीने स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा व मारेकऱ्यांना फाशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी मारेकऱ्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर व निर्घृणपणे हत्या झाली. सीआयडीच्या चौकशीतून संतोष देशमुख यांच्या हत्येचे सर्व व्हिडिओ […]

सविस्तर वाचा

श्री क्षेत्र तेलकुडगाव येथील ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सवाची भव्यदिव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी हगामाने सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तेलकुडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसीय ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात ग्रामस्थांचे सहकार्य व यात्रा कमिटीच्या योग्य नियोजनातून भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. महाशिवरात्रीनिमित्त हभप नंदकिशोर महाराज खरात यांची किर्तनसेवा झाली व तद्नंतर यजमान मंडळी यांच्या वतीने महाफराळ पंगत झाली. गुरुवारी सकाळी चैतन्य नागनाथ महाराजांच्या मुर्तीस भाविकांनी गंगेवरून पायी कावडीने […]

सविस्तर वाचा