बालाजी देडगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख  मान्यवरांनी आपल्या मनोगतातून  अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा परिचय दिला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पप्पू भिसे, माजी चेअरमन लक्ष्मण बनसोडे, युवा नेते निलेश कोकरे, राजू गोयकर, राजेंद्र बनसोडे सर, अनिल पेटे सर, मच्छिंद्र मुंगसे, सचिन गोयकर, पोपट बनसोडे, राधाकिसन बनसोडे, चंदू बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, भाजप नेते आकाश चेडे, भास्करराव तांबे, सागर बनसोडे, चांगदेव टकले, आबा बनसोडे, शैलेंद्र बनसोडे, पिंटू हिवाळे, बंडू टकले, महेश मुंगसे, लक्ष्मण कोकरे, इंन्नुस पठाण, अरुण मुंगसे, मयूर चेडे, महेश चेडे, विठ्ठल टकले, नारायण सदाशिव मुंगसे, संभाजी टकले, चांगदेव टकले, भाऊसाहेब सावंत, सोमा मुंगसे, मधुदेवा तांदळे आदी उपस्थित होते. शेवटी पप्पू भिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.