कुटेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कुटेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 आपल्या देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः विद्यार्थ्यांनी जल्लोषात घोषणा देत प्रभात फेरी काढली. यानंतर शाळेमध्ये देडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य श्री जालूमामा खांडे, सदस्य श्री विश्वास हिवाळे, श्री सोन्याबापू कुटे( जयहरी) व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री सोन्याबापू (तात्या) कुटे यांनी स्वीकारले. श्री गायकवाड सरांनी प्रास्तविक केले.प्रस्तविकामध्ये स्वातंत्र्याचा इतिहास, तसेच शाळेचे होत असलेली प्रगती, व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर माहिती सांगितली
यानंतर विद्यार्थी भाषणे झाली, इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी मधून भाषणे करून पालकाची वाहवा मिळवली. यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी इंग्रजी मधून संवाद साधला. सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यानंतर विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली. नंतर.. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण देशभक्ती गीतावर आधारित लेझीम नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. नृत्याला पालकांनी बक्षीसाचा वर्षाव करून दाद दिली.

1)श्री कल्याण कुटे सर यांनी शाळेसाठी रुपये 30 हजार रुपयांचा संगणक दिला
2)तसेच ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री जनाकाका कदम यांनी शाळेसाठी टू इन वन पंधरा हजार रुपये किमतीचा प्रिंटर दिला.
3) श्री शरद पवार यांनी शाळेसाठी रुपये सात हजार किमतीचे व्यासपीठ दिले
4)श्री शिवाजी बाबासाहेब काकडे यांनी स्टॅन्डसह टेबल फॅन दिला.
5) श्री महादेवजी खांडे यांनी संगणकासाठी टेबल रुपये 5000 किमतीचा दिला.
6)तसेच श्री अण्णासाहेब संजय तांबे यांनी रुपये दीड हजार किमतीची सूर्या कंपनीची गॅस शेगडी तसेच रोख पाचशे रुपये दिले.
शाळेसाठी भेट दिली.
7) तसेच श्री अर्जुन घोडके पाटील यांनी शाळेसाठी रुपये दीड हजार किमतीची सतरंजी भेट दिली.
8) तसेच श्री भाऊराव खांडे यांनी शाळेसाठी दोन खुर्च्या तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी सचित्र बालमित्र उजळणी भेट म्हणून दिली.
9)श्री ज्ञानदेव कदम चेअरमन यांनी इलेक्ट्रिक साहित्य शाळेमध्ये बसवण्यासाठी ज्या ज्या प्रकारची वायरिंग चा खर्च लागेल तो पूर्ण खर्च देण्याचे जाहीर केले.

यानंतर पालकांमधून श्री कल्याण बाळासाहेब कुटे सर यांनी मनोगत व्यक्त केले या मनोगतामध्ये शाळेची होत असलेली प्रगती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता,दोन्ही शिक्षकांचे होत असलेले उत्कृष्ट काम, याबद्दल दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांच्या इंग्रजी प्रगती बाबत व शाळेमध्ये होत असलेले विविध उपक्रम जसे की शालेय दिंडी,लेझीम नृत्य, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची इंग्रजी स्पिकिंग, व इतरही उपक्रमाचे कौतुक केले व पालकांनी असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यानंतर देडगाव ग्रामपंचायतचे सदस्य श्री जालू मामा खांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांनी शाळेत सादर केलेले देशभक्तीपर गीतावर आधारित लेझीम नृत्याचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेले इंग्रजी, मराठी ,आणि हिंदी मधून भाषण याचे सुद्धा कौतुक केले .व शाळेला ग्रामपंचायतीमार्फत इंटर ऍक्टिव्ह बोर्ड व मुलांसाठी शौचालय मंजूर केल्याचे उपस्थितांना सांगितले. व होता होईल ते सहकार्य ग्रामपंचायत देडगाव आपल्या कुटेवस्ती शाळेला करेल असे आश्वासन दिले.
व शाळेतील दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांची प्रगती करत आहेत याबाबत कष्ट घेत आहेत म्हणून दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले.

यानंतर सर्व देणगीदारांचा अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

शाळेत श्री सुनिल गायकवाड सर आणि सीमा गायकवाड मॅडम यांचे उत्कृष्ट कार्य तसेच इयत्ता पाचवी चा वर्ग सुरू केला म्हणून दोन्ही शिक्षकांचा सत्कार करून सन्मान केला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनिल गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सीमा गायकवाड मॅडम यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने करण्यात आली.

कार्यक्रमासाठी देडगाव ग्रामपंचायत सदस्य
जालूमामा खांडे,देडगाव ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास काकडे.बाळासाहेब कुटे, बन्सी अप्पा कुटे, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ ज्ञानदेव कदम चेअरमन सोन्याबापू कुटे (जयहरी), बापू कुटे,बन्सी खांडे, दत्तात्रय कुटे, कल्याण कुटे, अण्णासाहेब संजय तांबे, महादेव कुटे, बालाजी देडगाव देवस्थानचे विश्वस्त बबलू कुटे, गोरख माळी, सुरेश कुटे, संतोष कोकरे, महादेव खांडे, , यशवंत कोकरे, महेश खांडे,अर्जुन घोडके, जालिंदर तिडके,नवनाथ तिडके, आबासाहेब हिवाळे, श्री अतुल तांदळे देवा, भाऊराव खांडे, देवराव खांडे, बन्सी खांडे, नितीन साळवे, महादेव कुटे, अनिल घोडके, ओमकार खांडे,दावीद हिवाळे, भाऊसाहेब कदम, दगडू लाडके, साळवे मावशी .शाळेतील दोन्ही शिक्षक श्री सुनिल गायकवाड सर व सीमा गायकवाड मॅडम..उपस्थित होत्या.

कार्यक्रमासाठी वस्तू व देणगी भेट
१)श्री कल्याण कुटे संगणक : 30000 रुपये
2) श्री जनाकाका कदम टू इन वन प्रिंटर:15000 रुपये
3) श्री शरद पवार व्यासपीठ:7000 रुपये
4) श्री महादेव खांडे संगणकासाठी टेबल:5000 रुपये
5) श्री शिवाजी बाबासाहेब काकडे स्टॅन्डसह टेबल फॅन: 4000 रुपये
6) श्री भाऊराव खांडे: दोन खुर्च्या व पहिलीसाठी उजळणी रुपये 1800
7) श्री अण्णासाहेब तांबे शाळेसाठी गॅस शेगडी :1500 रुपये तसेच रोख 500
8)श्री अर्जुन घोडके सतरंजी: 1500
9) श्री ज्ञानदेव कदम चेअरमन वर्गात साहित्य बसविताना लागणार सर्व इलेक्ट्रिक खर्च:
वरील देणगीदार यांनी शाळेसाठी भेट दिली.

शाळेला गटशिक्षणाधिकारी श्री रामनाथ कराड साहेब ,केंद्रप्रमुख भास्करराव तांबे साहेब ,केंद्र मुख्याध्यापक कडु सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.या शाळेतील कार्यक्रमाचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.