देडगाव ग्रामपंचायतीत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने वंदे मातरम व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी केले.
कार्यक्रमास माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, केंद्रप्रमुख भास्कर तांबे साहेब, मा. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाहूरवाघ, मुख्याध्यापक कडू सर, नवनाथ मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, मेजर संजय काळे, मेजर देवकाते, मेजर सोमनाथ मुंगसे, मेजर गंगाधर बावधनकर, माजी उपसरपंच महादेव पुंड, रामचंद्र कदम, मच्छिंद्र मुंगसे , भाऊसाहेब सावंत गुरुजी, अरुण वांढेकर, शिवाजी तांबे, पोपटराव बनसोडे, पांडूभाऊ एडके, हरिभाऊ देशमुख आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा देण्यात आल्या. देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.