बालाजी देडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, तहसीलदार संजय बिरादार, अप्पर तहसीलदार सोनाली मात्रे मॅडम, पुरवठा नायब तहसीदार दुर्योधन रावसाहेब लाभले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त बाजीराव पाटील मुंगसे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. तर छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, तेलकुडगावचे सरपंच सतीशराव काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की, तालुक्यात नऊ शिबिरे पार पडली आहेत.या शिबिरातून सर्वसामान्याचे काम मार्गी लागणार आहेत. सर्व प्रशासकीय अधिकारी कामासाठी सज्ज आहेत. तालुक्याला जाण्याचा हेलपाटा होऊ नये म्हणून आपण या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी चांगली कामे करावी व जनतेला न्याय देण्याचा काम करावं. तसेच घरासमोर घरकुल बांधण्यासाठी मोजक्या प्रमाणात आलेली वाळूवर कारवाई करू नये, असे ठणकावून सांगितले. अशा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महसूल विभाग, पंचायत समिती आणि इतर शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये उत्पन्न, जातीचे दाखले आणि डोमिसाईल प्रमाणपत्रांसाठी जागेवरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे,नवीन रेशन कार्ड मिळवणे किंवा नावातील दुरुस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पीएम किसान योजना आणि पीक विम्याबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागाचे विस्तार अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार संजय बिराजदार बोलताना म्हणाले की, नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि त्यांचे प्रश्न गावातच सुटावेत, हा या महाराजस्व अभियानाचा मुख्य हेतू आहे. सांगत अनेक योजना विषयी माहिती दिली.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे या शिबिरामुळे मार्गी लागल्याने बालाजी देडगावच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गावातील वृद्ध आणि गरजू नागरिकांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळाला.

या शिबिरासाठी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, ह. भ. प. सुखदेव महाराज मुंगसे, माजी सभापती कारभारी चेडे, प्रा. नारायण म्हस्के, ॲड. अजय रिंधे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, रघुनाथ कुटे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, भाजपचे उपाध्यक्ष आकाश चेडे, निलेश कोकरे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथा, गोकुळ वांढेकर, अशोक मुंगसे,नवनाथ माने, सोपान शेंडगे, दत्तू काळे,वडाळा मंडळ अधिकारी फिरोज सय्यद, सोनई मंडळ अधीकारी प्रशांत कांबळे आदी मान्यवर, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देडगाव मंडलाधिकारी सुनील खंडागळे, तलाठी संतोष जाधव, ग्रामसेवक संतोष उल्हारे, फकीचंद हिवाळे गणेश तांबे, बाळासाहेब म्हस्के यांनी विशेष परिसर घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार देडगाव मंडलाधिकारी सुनील खंडागळे यांनी मानले.