बालाजी देडगाव (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदैवत बाबीर बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देवस्थानचे सर्वेसर्वा बाबासाहेब शिंदे, बाबीर देवस्थानचे अध्यक्ष मायनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १४ नोव्हेंबर व रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता सालाबादप्रमाणे बाबीर बाबांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी भव्य-दिव्य महाप्रसाद, गज ढोल व होईकचा कार्यक्रम संपन्न झाला. या यात्रा उत्सवानिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, मान्यवर तसेच सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

