बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून च्या मागणी असलेला कौठा ते म.ल. हिवरा रस्त्याच्या कामाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदर रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बसविण्यासाठी सहमती दर्शवली असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच प्रमोद गजभार यांनी दिली आहे.
नेवासा तालुक्यातील कौठा ते म.ल.हिवरा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत घेण्यासाठी मागणी दरवर्षी केली जात होती. परंतु हा होत नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड हाल होत होते. ३-४ किलोमीटर चिखलातून पायपीट करावी लागत असे. तसेच शाळेय विद्यार्थी व शेतकरी यांना दररोज ये- जा करण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत होते. हा रस्ता गावातील ८०-९० टक्के शेतकरी आपल्या शेतात वाडी वस्तीवर जाण्यासाठी उपयोग करत आहेत. परंतु पावसाळा सुरू झाला की दररोजची कसरत होत आहे. तसेच हा रस्ता कौठा ते हिवरा श्री खंडोबा पालखी मार्ग असल्याने या रस्त्याच्या मागणीसाठी कौठा गावचे सरपंच प्रमोद गजभार यांनी शिर्डीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेऊन ग्रामपंचायत ठराव देऊन रस्त्याच्या कामासंदर्भात वाकचौरे कडून सहमती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याकामी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे याचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे सरपंच प्रमोद गजभार यांनी सांगितले.


